अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांचा ढासळता आलेख आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सातत्याने होणारा परिणाम टाळण्यासाठी मोदी सरकार मोठ्या बदलांच्या तयारीत आहे. देशातील सुस्त अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे निर्णय घेऊ शकतात. करबचत आणि नोकरी संदर्भातील निर्णयाबद्दल याच आठवड्यापासून घोषणा केली जाऊ शकते. यापूर्वीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने संकटात सापडलेल्या उद्योगांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र, यापुढे जाऊन विस्तृतपणे निर्णय घेण्यात येणार आहेत.

भारतीय  अर्थव्यवस्था ५ लाख कोटींची बनवण्याचा निर्धार मोदी २.० सरकारने केला आहे. औद्योगिक क्षेत्रावर घोंगावणारे मंदीचे सावट हटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करणार आहे. या प्रकरणात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष देणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान स्वतः संवाद साधतील. उद्योगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानांशिवाय सरकारी खर्चातील कपातीचाही विचार केला जाऊ शकतो.

 

अशी केली जाणार अनावश्यक खर्चात कपात

सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक खर्चात कपात केली जाणार आहे. कल्याणकारी योजनांसाठी निधी अपूरा पडू नये याची खबरदारी केंद्राकडून घेतली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार करदात्यांना सवलत देण्याचा निर्णय घेऊ शकते. देशातील बेरोजगारीच्या संकटावर तोडगा काढण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.

@@AUTHORINFO_V1@@