'आय टेन' आता नव्या रुपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |



२० ऑगस्ट रोजी Grand i10 NIOS लॉन्च होणार आहे. भारतात ७ ऑगस्ट रोजी या कारची घोषणा झाली. मात्र, लॉन्चिंगपूर्वीच या कारची नोंदणी केवळ ११ हजार रुपये भरून तुम्ही ऑनलाईन करू शकता. देशातील सर्व डिलर्स आणि अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.



 

 
 

खास भारतासाठी या कारचे नाव Grand i10 NIOS, असे ठेवण्यात आले आहे. मात्र, भारताबाहेर ही कार i10 याच नावाने ओळखली जाणार आहे. नव्या Grand i10 NIOSचे इंजिन १.२ लिटर पेट्रोल आणि १.२ लिटर डिझेल या दोन्ही इंजिन प्रकारात उपलब्ध आहेत. ही दोन्ही इंजिन बीएस सहा या नियमावलीनुसार विकसित केली आहेत.





 

नव्या कारची किंमत ही सध्याच्या i10 पेक्षा अधिक असणार आहे. ग्रॅण्ड आय टेनची किंमत ४.९८ लाख ते ७.६३ लाखांपर्यंत आहे. सिग्नेचर कास्कैडिंग ग्रिल, बंपर गार्ड, लहान मात्र, आतील बाजूस आकर्षक डिझाईन, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एबीएस आणि ड्युअल एअर बॅग्स आदी आकर्षक वैशिष्ट्यांसह हे मॉडेल उपलब्ध असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@