प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीजचे भूमिपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |


 


संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची उपस्थिती


मुंबई : राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मूव्हमेंट सेंटरचे आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी या इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने या केंद्राची स्थापना करण्यात आली असून मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

"विद्यार्थी तसेच युवक-युवतींच्या चळवळींबद्दल तसेच जगामध्ये शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपले स्वतःचे समर्पित अभ्यास केंद्र असणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल,'' असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले. तर 'मुंबईत प्रा. बाळ आपटे यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबई विद्यापीठात नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे, यापेक्षा दुसरा आनंद नाही. आजच्या तरुण वर्गामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. व्यापक दृष्टिकोन ठेवून निर्माण करण्यात येणाऱ्या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी व युवावर्गाला त्यांच्यातील क्षमतांची जाणीव निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले.

 

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी,  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे,  शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, प्रा. बाळ आपटे यांच्या पत्नी निर्मला बाळ आपटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

@@AUTHORINFO_V1@@