मान्सूनमध्ये घ्या त्वचेची काळजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |



मान्सून हा तसा गुंतागुंतीचा मोसम. या दिवसांत हवा कोरडीही असते आणि दमटही. वातावरण ढगाळ असले तरीही सूर्याची हानिकारक UV-A आणि B किरणे त्वचेवर आघात करतच असतात. या मोसमात घाम तसेच सर्वसाधारण तेलकटपणाही वाढतो. म्हणूनच मान्सूनशी संबंधित त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांनी त्वचेच्या देखभालीसाठी सांगितलेली नित्यकर्मे करणे चांगले. हा विषय थोड्या अधिक तपशीलाने समजून घेऊया.


त्वचेचा प्रकार ओळखणे

 

त्वचेचे तीन ढोबळ प्रकार आहे. कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि मिश्र त्वचा (गालांवर कोरडी आणि कपाळ, नाक मिळून बनणाऱ्या टी-झोनमध्ये तसेच चेहऱ्याच्या बाह्य प्रदेशात तेलकट). यातील प्रत्येक प्रकारच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे समजून घेऊ.

 

) 'कोरड्या'त्वचेची देखभाल

 

चांगली त्वचा = मॉइस्चराइज्ड किंवा आर्द्रता जपून ठेवणारी त्वचा. मान्सूनच्या दिवसांमध्ये अनेक अ‍ॅलर्जी संभवतात आणि अ‍ॅलर्जिक त्वचा ही मूलत: कोरडी असते. अशा त्वचेला खाज आणि ओरखडे येऊ नयेत यासाठी तिला रोजच्या रोज मॉइस्चराईज करणे हा कळीचा उपाय आहे. आर्द्रता गमावून बसलेली त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसते. मॉइस्चरायझर्सचे दोन प्रकार आहेत - इमोलिएन्ट (Emollient) प्रकारचे मॉइस्चरायझर त्वचेच्या सर्वात वरच्या स्तरावर पसरते आणि त्वचेवरील आर्द्रतेच्या कणांचे वातावरणात बाष्पीभवन होण्यापासून रोखते, तर ह्यूमेक्टंट (Humectant) प्रकारचे मॉइस्चरायझर त्वचेच्या बाह्य स्तरावरील पाण्याचे प्रमाण वाढवते. काही मॉइस्चरायझर्स त्वचेची हानी भरून काढणाऱ्या नैसर्गिक मॉइस्चराइजिंग घटकांनी (Ceramides) समृद्ध असतात व ती अ‍ॅलर्जिक किंवा आजारी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या त्वचेसाठी कोणते मॉइस्चरायझर योग्य आहे, हे शोधण्यामध्ये तुमचे डर्मिटोलॉजिस्ट तुमची मदत करू शकतात.

 

) तेलकट त्वचेची देखभाल

 

शरीरातील हार्मोन्स तैलग्रंथींच्या कामाचे नियमन करत असतात आणि मान्सूनच्या काळात ते अधिक सक्रिय होतात. यामुळे त्वचा चिकट दिसते आणि तेलकट त्वचा असलेली माणसे चिकटपणा कमी करण्यासाठी त्वचेवर रोगणांचे थर लावतात, तेव्हा त्याची परिणती अ‍ॅक्ने/मुरुमांची समस्या उद्भवण्यामध्ये होते. तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा दूर करण्यासाठी मेडिकेटेड फेस वॉशचा (दिवसातून दोनदा व तीनदा) रोज वापर करणे आवश्यक आहे. मात्र, चेहरा सतत धुणे, स्क्रबिंग करणे मात्र टाळले पाहिजे. कारण, त्यामुळे त्वचेतील तैलग्रंथींना अधिक तेल स्रवण्याचा संकेत मिळतो. तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी पावसाळ्यात जाड मेक-अप करणे टाळायला हवे. त्याऐवजी त्यांनी वॉटर-बेस्ड कॉस्मेटिक्सचा वापर करायला हवा आणि त्वचा मॉइस्चराइज करण्यासाठी क्रीम्सच्या ऐवजी लोशन्सचा वापर करायला हवा. अ‍ॅक्नेचा वेळच्यावेळी बंदोबस्त करायला हवा. मात्र, हे करताना त्वचेवर डाग किंवा व्रण राहून जाऊ नये यासाठी आधी डर्मेटॉलॉजिस्टचासल्ला घ्यायला हवा. (ते तुम्हाला औषधे, क्रीम्स, केमिकल पील्सचे योग्य पर्याय सुचवू शकतील.)

 

) मिश्र त्वचेची देखभाल

 

या प्रकारची त्वचा म्हणजे कोरडा बाह्यस्तर आणि तेलकट अंत:स्तर यांचे मिश्रण असते. अशा त्वचेला साजेशा उपचारांची गरज असते, ज्यात सौम्य क्लिन्जर्स आणि चांगल्या प्रतीच्या मॉइस्चरायझर्सचा समावेश असायला हवा.

 

त्वचेच्या देखभालीचा मंत्र

 

पुढील तीन टप्प्यांतील देखभाल नित्यनेमाने करायला हवी.

- CTS : क्लिन्जिंग, टोनिंग आणि सनस्क्रीन लावणे (दिवसा)

- CTM : क्लिन्जिंग, टोनिंग आणि मॉइस्चरायजर लावणे (संध्याकाळी)

 

योग्य टोनरची निवड

- कोरडी त्वचा असलेल्यांनी अल्कोहोल फ्री टोनर्स वापरावेत.

- तेलकट त्वचा असलेल्यांनी अल्कोहोल-बेस्ड टोनर वापरावेत.

- मिश्र त्वचा असलेल्यांनी त्वचेवरील तेलकटपणा घालवण्यासाठी अल्कोहोल-बेस्ड टोनर, तर त्वचेला खाज येत असल्यास नॉन-अल्कोहोल टोनर्स वापरावेत.

 

योग्य SPF निवडा

ढगांमुळे उष्णता निर्माण करणारी अतिनील किरणे निश्चितच अडवली जातात, पण त्वचेसाठी हानिकारक UV-A आणि UV-B किरणे मात्र ढगांमुळे अडत नाहीत. त्यामुळे बाहेर पडताना किमान SPF-15 आणि UV-A (Boots star rating-3) असलेले मेडिकेटेड सनस्क्रीन लावावे. तुमच्या त्वचेला आणि हवामानाला साजेसे सर्वोत्तम सनस्क्रीन निवडण्याविषयी डर्मिटोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा.

 

शरीराची देखभाल

पावसाळ्यात बुरशीजन्य (सर्वाधिक आढळणारे), विषाणू आणि बॅक्टेरियाजन्य संसर्ग मोठ्या प्रमाणात होतात. नायटा (Tinea) किंवा गजकर्णासारखे (ringworm) बुरशीजन्य किंवा फंगल जंतुसंसर्ग वरचेवर होताना दिसतात. दमटपणा आणि ओलसरपणा असला की बुरशीचा फैलाव अधिक होतो. त्यामुळे शरीराला जिथे जिथे घड्या पडतात तिथे हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

- पावसात भिजला असाल, तर लवकरात लवकर कपडे आणि अंतर्वस्त्रेही बदलली पाहिजेत.

- या दिवसांत बुटांच्या आत मोजे घालू नयेत, त्याऐवजी बाहेर जाताना सॅण्डल्स, तर आत असताना बंद बूट घालणे योग्य

- मोजे घालण्यापूर्वी डर्मिटोलॉजिस्ट्सनी बुरशीजन्य जंतूसंसर्ग रोखण्यासाठी लिहून दिलेल्या अ‍ॅण्टि-फंगल डस्टिंग पावडरचा सढळ वापर करावा. ही डस्टिंग पावडर अंघोळीनंतर तसेच रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या घड्यांवर सर्वत्र मारावी.

 

थोडक्यात टिप्स

- सैलसर सुती कपडे घाला.

- भिजलेले कपडे अंतर्वस्त्रांसह ताबडतोब बदला.

- कामावरून घरी आल्यावर अंघोळ करा व आपल्या शरीराचे घडीचे भाग नीट स्वच्छ करा.

- कपडे बदलताना डस्टिंग पावडरचा वापर करा.

- खाजवणे शक्यतो टाळा.

- 'अ' आणि 'क' जीवनसत्व असलेली फळे आणि भाज्या यांची रेलचेल असलेला संतुलित आहार घ्या.

- दिवसातून दोन-तीन लीटर पाणी पिऊन व अंघोळीनंतर दमट त्वचेवर मॉइस्चरायझर लावून त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवा.

- बाहेर जाताना सनस्क्रीनचा सढळ वापर करावा.

 

- डॉ. स्मृती नासवा सिंग

@@AUTHORINFO_V1@@