होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग - भाग २८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |



पदार्थाचा सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणू (Atom) जर आपण अणूचे निरीक्षण केले असता असे दिसते की, अणूमध्ये 'गाभा' किंवा 'Nuclear' ज्याला 'केंद्रक' असेही म्हणतात. ते स्थिर असते व त्याच्या आत प्रोटॉन व न्युट्रॉन असतात व हे केंद्रक पॉझिटीव्ह भारीत असते व त्यांच्या आजूबाजूला एका ठराविक परिघात इलेक्ट्रॉन परिक्रमा करत असतात.


आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले असून पंचमहाभूते ही निसर्गाचीच अविभाज्य अंगे आहेत. म्हणजेच जे विशाल पातळीवर निसर्गात दिसले, तेच सूक्ष्म पातळीवर शरीरात प्रत्येक पेशीत दिसते. जसे आपण पाहिले की सूर्य हा स्थिर असून ग्रह त्याच्या बाजूला एका विशिष्ट परिघाद्वारे परिक्रमा करत असतात. हे ग्रह कधीही आपला परिघ किंवा मार्ग सोडत नाहीत. हे सर्व अनादी अनंत काळापासूनचे सत्य आहे. हे झाले अतिविशाल पातळीवर. पदार्थाचा सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणू (Atom) जर आपण अणूचे निरीक्षण केले असता असे दिसते की, अणूमध्ये 'गाभा' किंवा 'Nuclear' ज्याला 'केंद्रक' असेही म्हणतात. ते स्थिर असते व त्याच्या आत प्रोटॉन व न्युट्रॉन असतात व हे केंद्रक पॉझिटीव्ह भारीत असते व त्यांच्या आजूबाजूला एका ठराविक परिघात इलेक्ट्रॉन परिक्रमा करत असतात. जे अतिविशाल प्रमाणात निसर्गात आहे, तेच अतिसूक्ष्म प्रमाणात प्रत्येक वस्तूत आहे. यालाच आपण म्हणतो 'जे पिंडी तेच ब्रह्मांडी' असे म्हणतो.

 

याचाच अर्थ असा की, जेव्हा चिकित्सक रोग्याच्या आजाराचा गाभा शोधत असतो, तेव्हा या लक्षणाच्या व चिन्हांच्या आधारे एक 'पॅटर्न' बनवून या समान नमुना निसर्गात कुठे पाहायला मिळतो, याचा शोध घेतला जातो. यामुळेच होमियोपॅथीची सर्व औषधे निसर्गातील घटकांपासून तयार केली जातात. या औषधांची मग नैसर्गिकरीत्याच सिद्धता केली जाते. (होमियोपॅथीचा औषध सिद्धतेचा सिद्धांत) निसर्गातील घटक कसे वर्तन करतात व त्याचे गुणधर्म काय याचाही अभ्यास होमियोपॅथीमध्ये केला जातो. उदा. होमियोपॅथीची औषधे ही वनस्पतिजन्य प्राणिजन्य व खनिजजन्य असतात. त्यामुळे जे औषध ज्या मूळ स्रोतापासून बनलेले असते, त्या स्रोताचे विविध गुणधर्म हे त्या औषधामध्ये आलेले असतात. आता हे औषध जेव्हा निरोगी माणसांना सिद्धतेसाठी दिले जाते, तेव्हा ते औषध निरोगी माणसांमध्ये काही विशिष्ट लक्षणे व चिन्हे निर्माण करते. या सर्वांचा सखोल अभ्यास करून त्याची व्यवस्थित नोंद केली जाते व औषध सिद्ध केले जाते. (र्ऊीीस र्झीेींळपस) जेव्हा रुग्णामध्ये आजाराची लक्षणे व चिन्हे दिसतात तेव्हा त्या लक्षणांचा व चिन्हांचा 'पॅटर्न' हा सिद्ध केलेल्या कोणत्या नैसर्गिक घटकांशी मेळ खातो आहे. याचा अभ्यास करुन 'सम' अशी औषधे दिली जातात. आता ही 'सम' किंवा सारखी औषधे शोधण्यासाठी केस टेकिंग करून झाल्यावर पूर्ण विश्लेषण करावे लागते. याच विश्लेषणाबद्दल आपण पुढील भागात माहिती जाणून घेणार आहोत.

 

हे विश्लेषण म्हणजे रुग्णांच्या आजाराच्या लक्षणाशी व निसर्गातील घटकांची कशी सांगड घातली जाते याचा अभ्यास असतो. त्या आधी एकदा का सर्व केस टेकिंग किंवा चिकित्सा पूर्ण झाली की, मग चिकित्सक रुग्णाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचा व्यवस्थित संग्रह करत असतो, यालाच 'रेकॉर्ड किपिंग' असे म्हटले जाते. हा संग्रह फार महत्त्वाचा असतो. रुग्णाच्या आजाराचे विश्लेषण व त्याला बरे करण्यासाठी केले जाणारे उपाय हे सर्व त्यात नमूद असतात. याचबरोबर औषधाच्या मात्रांची ही नोंद त्यात केलेली असते. पुढील भागात आपण आता केस टेकिंग नंतरचे विश्लेषण पाहूया...

 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@