पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य नाही - ग्रान्ट फ्लॉवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2019
Total Views |




मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक ग्रान्ट फ्लॉवर यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य नसून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाकिस्तान हा देश सुरक्षित नसल्याचे ईएसपीएनक्रिकइंफो या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये फ्लॉवर यांनी पाकिस्तानी संघासोबतचे आपले अनुभव सांगितले. फ्लॉवर २०१४ पासून पाकिस्तानी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. मागील आठवड्यातच त्यांचा आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा करार संपला असून पीसीबीने त्यांना मुदतवाढ दिलेली नाही.


पाकिस्तानमध्ये सर्वात निराशाजनक कोणती गोष्ट वाटली ? या प्रश्नाचे उत्तर देताना फ्लॉवर यांनी पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य नसून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा देश सुरक्षित नसल्याचे सांगितले. याशिवाय पाकिस्तानचा प्रशिक्षक म्हणून काम करताना तुम्हाला आठवणंही नकोय अशी कोणती गोष्ट आहे ? असा प्रश्न विचारला असता फ्लॉवर म्हणाले, 'माजी खेळाडूंचे मागे राजकारण करणे, टीव्ही वाहिन्यांमधून घडणारे राजकारण, क्रिकेट बोर्डात घडणारे राजकारण मला अजिबात आठवायचे नसल्याचे फ्लॉवर म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@