पाकड्यांच्या नापाक हरकती सुरूच; एक जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2019
Total Views |



जम्मू-काश्मीर : कलम ३७० रद्द केल्यानंतर सैरभर झालेल्या पाकिस्तानच्या नापाक हरकती अद्याप चालूच आहेत. आज सकाळी साडेसहा वाजता नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानकडून अंधाधुन गोळीबार करण्यात आला. यात एक भारतीय जवान शहीद झाला असून भारतीय लष्करानेही या गोळीबाराला जशाच तशे उत्तर दिले आहे.

 

पाकिस्तानकडून नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आला. सकाळी साडेसहा वाजता सुरु झालेला गोळीबार अद्याप चालूच असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात देहरादूनचे रहिवासी असलेले जवान लान्स नायक संदीप थापा (वय ३५) हे शहीद झाले झाले असून ते मागील १५ वर्षांपासून लष्करात सेवा बजावत होते.

 

जम्मू-काश्मीर पुर्वपदावर

 

कलम ३७०च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लावलेले निर्बंध हळूहळू उठविण्यास सुरुवात केली आहे. जम्मूमध्ये २ जी इंटरनेट व काश्मीरमध्ये फोन सेवा सुरू करण्यात आली आहे. उधमपूर, रियासी, कठुआ, सांबा व जम्मू शहरात २ जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली असून तेथील अन्य सर्व निर्बंधदेखील उठवण्यात आले आहेत. दरम्यान, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@