मुंबईतील एक खड्डा १७ हजारांचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2019
Total Views |




,८७९ खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने १५ कोटी ७१लाख २९ हजार रुपये खर्च केले


मुंबई : मुंबई महापालिकेत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईबाबत आणि पावसाळ्याच्या मध्यावर खड्ड्यांबाबत मोठ्या प्रमाणात आरोपप्रत्यारोपांचा चिखल उडतो. मात्र त्याच्या खर्चाचा निश्चित आकडा माहिती अधिकारातून मिळतो. या अधिकारातूनच एक खड्डा बुजवायला १७ हजार रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

 

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही दरवर्षी नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोच. यंदा १० जून ते १ ऑगस्टपर्यंत रस्त्यांतील २,६४८ खड्डयांपैकी २,३३४ खड्डे बुजवल्याचा आणि फक्त ४१४ खड्डे बाकी असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यासाठी किती खर्च आला याची माहिती लवकरच जाहीर होईल. मात्र २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षात तब्बल ८,८७९ खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने १५ कोटी ७१लाख २९ हजार रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे एका खड्ड्यावर तब्बल १७ हजार रुपये खर्च करण्यात आले असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

 

रस्ते बांधकामासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अल्पावधीतच खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. हमी कालावधीतच खड्डे पडत असल्याने त्यांचा दर्जा लक्षात येतो. मात्र पालिकेच्या चालढकल धोरणामुळे ठेकेदारांचे फावते आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. हे खड्डे बुजवण्यासाठीही कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. २०१३ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत रस्त्यांतील खड्ड्यांच्या एकूण २४१४६ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी पालिकेने २३३८८ खड्डे भरल्याचा दावा केला आहे. तसेच २०१३ ते २०१९ या कालावधीत खड्डे भरण्यासाठी एकूण १७५ कोटी ५१ लाख ८६ हजार तरतूद निधींपैकी आतापर्यंत ११३ कोटी ८४ लाख ७७ हजार रुपये खर्ची पडले आहेत, अशी माहिती मिळाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@