योगी आदित्यनाथ ठरले 'सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : 'इंडिया टुडे'च्या 'मुड ऑफ दि नेशन' (एमओटीएन)च्या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री' म्हणून सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यांनी सलग ४ वेळा पहिल्या स्थानावर असलेल्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. या सर्वेक्षणानुसार २० टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना पसंती दिली आहे.

 

सलग ४ वेळा ममता बॅनर्जी पहिल्या क्रमांकावर होत्या परंतु आता त्यांची सरळ ५व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. यावेळेस त्यांना फक्त ६ टक्के लोकांनीच पसंती दर्शवली. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे चौथ्या स्थानावर ७ टक्क्यासह चौथ्या स्थानावर आहेत. योगी आदित्यनाथ हे सध्या २० टक्क्यांनी अग्रस्थानी आहेत. तसेच, त्यांच्या नंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे १० टक्क्यांनी दुसऱ्या स्थानी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ८ टक्क्यांनी तिसऱ्या स्थानी आहेत.

@@AUTHORINFO_V1@@