काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत कलम ३७० रद्द करत जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केले. या निर्णयानंतर आक्रमक झालेल्या पाकिस्तान वारंवार याप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या बाजूने मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकने हा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नेला. पण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष असणाऱ्या पोलंडकडून स्पष्ट शब्दांत पाकची कानउघाडणी करण्यात आली. या समस्येचे निराकरण द्विपक्षीय स्तरावरच होऊ शकते, असे पाकला सांगण्यात आले. त्यानंतर चीनने ही भारताच्या या निर्णयाच्या विरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे गुप्त बैठकीची मागणी केली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलंडने ही बैठक शुक्रवारी घेण्याचे ठरविले आहे. ही बैठक बंदद्वार असून त्यात पाकिस्तानच्या प्रतिनिधींनाही प्रवेश दिला जाणार नाही. बैठकीतील चर्चेचा तपशील जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
 
 

चीनवगळता सुरक्षा परिषदेतील अन्य चारही स्थायी सदस्य देशांनी भारताच्या बाजूने मतप्रदर्शन केले आहे. काश्मीरसह भारत आणि पाकिस्तानातील सर्व वादाचे मुद्दे हे केवळ द्विपक्षीय चौकटीतले असून त्यात त्रयस्थ देशांचा हस्तक्षेप नको, अशी ठाम भूमिका भारताने वेळोवेळी मांडली आहे. त्या भूमिकेचे या चारही देशांनी समर्थन केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काश्मीरमधील घडामोडी ही भारताची अंतर्गत बाब आहे, असे म्हटले आहे. काश्मीर प्रश्नावरील चर्चेला दुय्यम स्थान देण्याची फ्रान्सची मागणी आहे. त्यावरूनही चीन आणि फ्रान्समध्ये मतभेद असल्याचे समजते. यापूर्वी १९६५ मध्ये काश्मीरप्रश्नी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत चर्चा झाली होती.

@@AUTHORINFO_V1@@