इस्रोचे के. सिवन यांना 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे तामिळनाडू सरकारने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गुरूवारी त्यांना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.

 

विज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

जानेवारी २०१८ मध्ये शिवन यांची इस्रोच्या संचालकपदी निवड झाली. त्यांनी १५ जानेवारी २०१९ रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या अध्यक्षतेखाली इस्रोने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयानाचे प्रक्षेपण केले. चांद्रयान - २ मोहिमेमध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@