पाकिस्तानात फडकला भारताचा राष्ट्रध्वज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |


 


इस्लामाबाद : गुरुवारी सर्वत्र भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळेस पाकिस्तानमध्येदेखील भारतीय राष्ट्रध्वज फडकला. पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात ७३व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुवारी मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. पाकिस्तानातील उच्च आयोगामध्ये झेंडा फडकतच राहील, असे भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी टि्वटमधून सांगितले.

 
 
 

"भारताच्या ७३व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्लामाबाद येथील भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात भारतीय तिरंगा फडकवण्यात आला. इथला जोश खूप जास्त आहे. जय हिंद." असे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट केले आहे. यावेळी अधिकारी गौरव अहलुवालिया यांनी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रपतींचा संदेश वाचला.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@