एप्रिल-जून तिमाहीतील निर्यातीत ३.१३ टक्क्यांनी वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारताची निर्यात १८१.४७ अब्ज डॉलर रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ३.१३ टक्क्यांनी जास्त आहे. केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सरकार जुलै २०१९ मध्ये देशातील निर्यात २.२५ टक्क्यांनी वाढून २६.३३ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

एप्रिल ते जुलै महिन्यात भारतातील एकूण आयात १४.३७ अब्ज डॉलर इतकी होती. जुलै २०१९ मध्ये आयात १०.४३ टक्के घटली असून ३९.७६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जुलैमध्ये व्यापारातील घट १३.४३ अब्ज इतकी राहीली आहे. गेल्या वर्षात जुलै महिन्यात व्यापारातील तोटा १८.६३ अब्ज डॉलर इतका होता.

 

रसायने, लोखंड, औषधे आदी क्षेत्रातील निर्यातीत वृद्धी नोंदवण्यात आली आहे. तसेच, हिरे, अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम पदार्थ आदी क्षेत्रातील निर्यातीत घसरण झाली आहे. सोन्याची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२.२ टक्क्यांनी घसरली आहे. कच्च्या तेलाची आयात २२.१५ टक्क्यांवरून घसरून ९.६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@