मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवास : आता १६० किमी वेगाने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |



मुंबई : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतला. या दोन प्रमुख शहरांतील रेल्वे प्रवास १० तासांपेक्षा कमी वेळेत करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ६८०६ कोटींच्या रेल्वे प्रकल्पास मंजुरी दिली.

 

सरकारच्या या प्रकल्पांतर्गत रेल्वे गाड्या १६० प्रतिकिलोमीटर वेगाने धावणार असून मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांतील अंतर साडेतीन ते चार तासांनी कमी होणार आहे. एकूण १४८३ किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग असून राजधानी एक्सप्रेसपेक्षाही अधिक वेगाने आगामी काळात या मार्गावरून गाड्या धावणार आहेत.

 

हा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्णत्वास नेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निर्धारित केले असून २०२३-२४ पर्यंत मुंबई-दिल्ली रेल्वे प्रवास अवघ्या दहा तासांपेक्षा कमी होणार आहे. या माहितीचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले आहेत.

 
@@AUTHORINFO_V1@@