कलम ३७० विरोधातील याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2019
Total Views |
 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकाकर्त्यांना न्यायालयाने फटकारले आहे. याचिकाकर्ते एम. एल. शर्मा यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांत त्रुटी आढळल्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी चांगलेच फैलावर घेतले. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. ए. बोबडे, न्या. एस. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना पुन्हा याचिका दाखल करण्यास सांगितले आहे.

 

याचिकाकर्ते एम.एल.शर्मा यांनी काश्मीरप्रश्नी कलम ३७० रद्द केल्याविरोधात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी घेताना सरन्यायाधीश म्हणाले, "मी ही याचिका तीन वेळा वाचली आहे. मात्र, मला काहीच अर्थ लागला नाही. ही याचिका मला फेटाळून लावता आली असती. मात्र, यामुळे कलम ३७० बद्दलच्या इतर याचिकांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून हा निर्णय टाळत आहे."

 

'कलम ३७०' विरोधातील चार याचिका निरर्थक

कलम ३७० विरोधात दाखल करण्यात आलेल्या सहा याचिकांपैकी चार याचिका निरर्थक असल्याचेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. या प्रकरणी उत्तर देताना याचिकाकर्ते एम.एल.शर्मा यांनी आवश्यक ते बदल करून पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@