पंतप्रधानांची मोठी घोषणा : आता तिन्ही दलांसाठी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019
Total Views |


 

 

आता 'एक देश, एक निवडणूक'वर विचार करण्याची वेळ : पंतप्रधान

 

नवी दिल्ली : देशभरात ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जल्लोषात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आणि देशाला संबोधित केले. यावेळेस त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.त्यांची सर्वात पहिली मोठी घोषणा म्हणजे देशाच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरकार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेमणार आहे. या पदावरील व्यक्ती तिन्ही दलांचे नेतृत्व करणार, असे त्यांनी सांगितले.

 

पुढे पंतप्रधान मोदींनी सांगितले की, "देशाची सुरक्षा दले हा आपला अभिमान आहे. ही तिन्ही दले आणखी मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बदलत्या परिस्थितीत तिन्ही दलांमधील समन्वय वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वयक म्हणून 'चीफ ऑफ डिफेस स्टाफ' हे पद निर्माण केले जाणार आहे. या पदावरील व्यक्ती तिन्ही सैन्य दलाची प्रभारी म्हणून काम पाहिल," असे मोदी यांनी सांगितले.

 

हे आहेत पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठराविक मुद्दे :

 

- देशातील अनेक भागात पूरग्रस्तस्थिती आहे, मी त्यांचे सांत्वन करतो, राज्य सरकारांनी जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत

- देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान, योगदान देणाऱ्या सर्वांना नमन करतो

- कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करणे हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे

- फक्त १० दिवसात सरकारने देशहिताची पावले उचलली

- निराशा आशेत बदलली, देश बदलू शकतो, हा विश्वास निर्माण झाला

- जर २०१४ ते २०१९ हा गरजांची पूर्तता करण्याचा काळ होता, तर २०१९ नंतरचा काळ हा देशवासीयांच्या आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्याचा कालखंड आहे

- 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र घेऊन आम्ही चाललो होतो, पण ५ वर्षातच देशवासीयांनी 'सबका विश्वास'च्या रंगाने संपूर्ण वातावरण रंगवले

- आम्ही अडचणी टाळत नाही किंवा कुरवाळत बसत नाही, अशी या सरकारची ओळख आहे. जे काम मागील ७० वर्षात झाले नाही ते ७० दिवसांत झाले

- आज देश अभिमानाने सांगू शकतो की, 'एक देश, एक संविधान'

- येत्या काळात 'जल जीवन मिशन' सुरू करून प्रत्येक घरात पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न, साडेतीन लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम या मिशनसाठी तरतूद केली जाईल.

- वाढती लोकसंख्या हे देशासमोरसाचे मोठे आव्हान आहे, छोटे कुटुंब म्हणजे देशभक्तीचे कार्य, छोट्या कुटुंबामुळे विकासाला चालना मिळते

- सरकारने हळूहळू लोकांच्या आयुष्यातून बाहेर पडावे, जेणेकरून ते स्वातंत्र्याने जगू शकतील. सरकारचा दबाव नसावा किंवा सरकारचा अभाव नसावा

- मी दरदिवशी एक कायदा रद्द केला, १४५० कायदे रद्द केले आहेत, ही स्वतंत्र भारताची आवश्यकता होती

- देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवायचे आहे, जगात आपले स्थान प्रस्थापित करायचे आहे, पहिल्यांदा लोक विचारायचे पक्के रस्ते कधी होणार? आता,  ४-८ पदरी हायवे कधी बनणार?, असे विचारतात

- काही देश केवळ भारतालाच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना दहशतवादाने उद्ध्वस्त करत आहे. बांगलादेश आणि श्रीलंकाही दहशतवादाचा सामना करत आहेत

- तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' हे पद नव्याने निर्माण करणार

- प्लास्टिकमुक्तीसाठी अभियान सुरू करणे गरजेचे आहे. दुकानांमध्ये प्लास्टिक पिशवी न मागण्याचे बोर्ड लावा

- तुम्ही लक्ष्य ठेवा की, देशातील कमीत कमी १५ पर्यटन स्थळांना भेट देऊन भारतीय संस्कृतीच विविधता पाहा

@@AUTHORINFO_V1@@