नेमबाज हिनाचा पाक मंत्र्यावर 'नेम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019
Total Views |



मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर जगभरातून त्याचे स्वागत झाले. परंतु, या निर्णयामुळे पाकिस्तानला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान आणि त्यांच्या नेत्यांकडून बालिश निर्णय घेण्यात आले. ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. एकीकडे भारतासोबत व्यापार पाकिस्तानने बंद केला, तर दुसरीकडे समझोता एक्सप्रेस आणि भारतीय चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी घातली गेली. यानंतर आता पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद हुसेन यांनी एक आक्षेपार्ह्य ट्विट केले होते. या ट्विटला भारताची नेमबाज हिना सिधूने सडेतोड उत्तर दिले.

 
 
 

पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद हुसेन यांनी ट्विटमध्ये म्हंटले होते की, "भारतीय लष्करातील सर्व पंजाबी जवानांनो, काश्मीरमध्ये जो अन्याय आणि अत्याचार सुरू आहे, त्यात सहभागी होऊ नका. त्या भागात सेवेवर जाण्यास तुम्ही नकार द्या." यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यावर हिनाने त्यांच्यावर नेम धरत त्यांना चांगलेच प्रत्युत्तर केले. 

 
 
 

"भारताच्या सुरक्षेसाठी पंजाबी लोक कायमच तत्पर राहिले आहेत. मी पंजाबी आहे आणि सिधू आहे. शिख समाजाचा इतिहास तुम्ही वाचला असाल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे लष्कराचा विषय बाजूला राहू दे. आमची सुरक्षा करण्यासाठी आम्ही लष्करी सेवेतच भरती होण्याची गरज नाही." असे हिनाने ट्विट करत उत्तर दिले.

@@AUTHORINFO_V1@@