प्रत्येक भारतीयाने देशातील १५ पर्यटन स्थळांना भेट द्यावी : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : आज भारताच्या ७३ व्या स्वातंत्रदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींनी लालकिल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाने देशातील १५ पर्यटन स्थळांना भेट द्यावी असे आवाहन केले. देशातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी सरकार आग्रही आहे. पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे. संपूर्ण जगाला भारतातील संस्कृती जाणून घेण्याची उत्सुकता आहे. यासाठी पुढील काळात भारतातील पर्यटन स्थळांचा विकास करून त्यातून रोजगार निर्मिती करणे हे सरकारचे ध्येय आहे. भारतातील पर्यटन स्थळांचा विकास झालास अनेक लहान लहान उद्योगांना चालना मिळून त्याभागातील स्थानिकांना रोजगाराचे नवीन साधन निर्माण होईल. या उद्देशाने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
 

 

 
कलम ३७०, तिहेरी तलाक, दहशतवादविरोधी विधेयक याशिवाय नव्या योजनांचा समावेश होता.  याबरोबरच गेल्या ७० दिवसांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे देशात नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मोदींनी म्हटले. देशात जलसिंचन, जलसंचय वाढवण्यासाठी सरकारने 'जल जीवन मिशन' या नव्या योजनेची घोषणा केली.
@@AUTHORINFO_V1@@