सावरकर स्मारकाचे स्वप्नील परब यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019
Total Views |

 


मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या धनुर्धारींचे प्रशिक्षक स्वप्नील दत्ताराम परब यांना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई शहर क्रीडा क्षेत्रात मोलाची कामगिरी करुन जिल्ह्याचा मान वृद्धिंगत केल्याबद्दल गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून हा पुरस्कार दिला गेला आहे.

 

स्वप्नील परब हे धनुर्धारी प्रशिक्षक म्हणून गेली १० वर्षे कार्यरत असून त्यांनी प्रशिक्षित केलेल्या ५२ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तर २५० हून अधिक विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पारितोषिके मिळालेली आहेत. स्मारकाच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्येदेखील भाग घेतला आहे. स्वप्नील परब यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संघटनेची शिष्यवृत्तीदेखील मिळालेली आहे.

 

स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सारवकर, विश्वस्त मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर तसेच मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@