धोनी लडाखमध्ये साजरा करणार आजचा स्वातंत्र्य दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019
Total Views |


 

आज देशभर ७३ व्या स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी याने देखील देशवासियांना आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. गेले तीन दिवस तो लडाखमध्ये असून त्याच्या या दौऱ्या दरम्यान त्याने आर्मीच्या सद्भावना शाळेतील मुलांना भेट दिली.

 

धोनीबरोबरच संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाने भारतवासीयांना एका व्हिडिओमधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने आपल्या अधिकृत अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पासून संघ प्रशिक्षक रवी शात्री यांनी देखील स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

संपूर्ण भारतवासीयांसाठी आजचा दिवस हा प्रचंड अभिमानाचा आणि औत्सुक्याचा आहे. या दिवसाचे महत्व प्रत्येक भारतीयाला असते कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@