काँग्रेस कार्यकर्त्यांची मुजोरी : प्रियांका गांधींसमोर पत्रकाराला दिली धमकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |



 

 

नवी दिल्ली : "प्रियांका गांधीजी तुमचे कलम ३७०बद्दल काँग्रेस पक्षातर्फे मत सांगा", असा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला प्रियांका गांधींसह असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मारण्याची धमकी दिली. "ठोक कर यहीं बजा दूँगा,  मारूँगा तो ज़मीन पर गिर जाओगे," अशी धमकी देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एबीपी न्यूजच्या पत्रकाराला धक्काबुक्की केली. तसेच या प्रकाराचे छायाचित्रण करणाऱ्या कॅमेरामनला कॅमेरा फोडू, अशी धमकी दिली.




 

 

प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकार नितीश पांडे यांना कार्यकर्ते धमकी देत असतानाचा प्रकार प्रियांका गांधी यांनी पाहूनही दुर्लक्ष केले. मला इथून जाऊ द्या, असे सांगत प्रियांका तिथून निघून गेल्या. पांडे यांनी प्रियांका गांधींना ओरडून तुमचे कार्यकर्ते माझ्याशी धक्काबुक्की करत असल्याचेही सांगितले. मात्र, प्रियांका गांधी यांनी या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष केले. याविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. एबीपी न्यूझचे पत्रकार विकास भदौर्या यांनी ट्विटरद्वारे प्रियांका गांधींना या प्रकाराचा जाब विचारला आहे.

@@AUTHORINFO_V1@@