भारतमातेच्या वीरपुत्रांचा गौरव होणार : अभिनंदन यांना वीरचक्र पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शौर्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्याला उत्तर देताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे 'एफ १६' हे लढाऊ विमान पाडले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना या पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

 

बालाकोटमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी हवाई दलाचे 'एफ १६' हे विमान विंग कमांडर अभिनंदन यांनी पाडले होते. मात्र, यात त्यांचे 'मिग २१' हे विमान कोसळले होते. त्यानंतर ते पाकिस्तानातील हद्दीत गेले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना कैद केले होते. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणत अभिनंदन यांची सुटका करण्यासाठी भाग पाडले होते.

 

भारतीय हवाई दलाच्या स्व्काड्रन लीडर मिंती अग्रवाल यांना "युद्ध सेवा' पदकाने सन्मानित केले जाणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानसह झालेल्या हवाई संघर्षात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याशिवाय भारतीय सैन्यदलाचे राष्ट्रीय रायफल्सचे सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तीचक्राने सन्मानित केले जाणार आहे. जम्मू-काश्मीरमधील एका मिशनवर त्यांनी वीरता दाखवली होती. 

 
@@AUTHORINFO_V1@@