आधीच खायचे वांदे आणि म्हणे युद्ध करू...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |
 
मुझफ्फराबाद : भारताला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर सज्ज असल्याची धमकी आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली. पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुजाफ्फराबादला भेट दिली व पाक जनतेला संबोधित केले. त्या भाषणात त्यांनी भाजपावर निशाणा साधला. पाकिस्तानची लढाई एका विचारधारेविरोधात आहे. ही विचारधारा भयंकर आहे असं म्हणत त्यांनी भाजपावर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर आक्रमक झालेल्या इम्रान खान यांनी यावेळी भारताविरुद्ध युद्धासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला भारतच जबाबदार असेल, असा उल्लेखही त्यांनी केला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने कोणतीही कारवाई केली तर आम्ही शांत बसणार नाही. पाकिस्तानी लष्करासोबतच सर्व जनता भारताविरुद्ध मैदानात उतरेल, असे ते म्हणाले.
 
 
कलम ३७० अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर आणि राज्याच्या पुनर्रचनेसंदर्भातील विधेयक मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला होता. पाकिस्तानने भारताबरोबरील द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. पण त्यांच्या या निर्णयाने पाकिस्तानातील व्यापार पूर्णतः ठप्प झाला असून पाकिस्तानमधील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पाकिस्तानात सर्वसामान्य नागरिक व कामगारांचे अतोनात हाल होत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@