ताश्कंदनंतर 'द काश्मीर फाईल्स' मधून कोणते गूढ उलगडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |


 

ताश्कंद फाईल्स नंतर आणखी एक इन्वेस्टिगेटिव्ह चित्रपट घेऊन विवेक अग्निहोत्री प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. उद्या भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि याच निमित्ताने पुढील वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट घेऊन येत असल्याचे आज अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावर जाहीर केले. हा चित्रपट काश्मिरी हिंदूंच्या सर्वात दुःखद अशा नरसंहाराविषयी असून त्याची नोंद आत्तापर्यंत कोणीही घेतलेली नाही अशा काही गोपनीय गोष्टी या कथेमधून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचेदेखील त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

काश्मिरी हिंदूंविषयीची कथा सर्वांसमोर उघड कारणे, ही जोखीम स्वीकारल्यामुळे 'द काश्मीर फाईल्स' च्या टीमला पाठिंबा द्या, असे आवाहन विवेक अग्निहोत्री यांनी या पोस्टच्या माध्यमातून केले आहे. या आधी ताश्कंद फाईल्स मधून भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूविषयीचे काही धागेदोरे चित्रपटात उलगडण्यात आले, ज्यामध्ये देशातील काही प्रभावशाली व्यक्तींचीदेखील नावे यामध्ये घेण्यात आली. त्यामुळे चित्रपटाविषयी सर्वांमध्ये उत्सुकता होती आणि तो प्रदर्शित झाल्यावर त्याविषयी अनेक चर्चादेखील रंगल्या.

आता 'द काश्मीर फाईल्स' मध्ये नक्की काय गूढ आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना असणार आहे. ज्याचे ब्रीदवाक्य 'ताश्कंद फाईल्स' या चित्रपटाशीच संलग्न असून 'सत्य जाणून घेण्याचा अधिकार कायम राहील' असे आहे.

@@AUTHORINFO_V1@@