इंटरनेट हे पाकिस्तानातील समाजकंटकांचे शस्त्र : सत्यपाल मलिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर राज्यातील वाहतूक व दळणवळणाच्या सोयींवर घालण्यात आलेले निर्बंध १५ ऑगस्टनंतर शिथील करणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली. इंटरनेट आणि दूरध्वनी हे पाकिस्तानी आणि समाजकंटकांच्या हातातील शस्त्र आहे, ते आम्ही त्यांच्या हाती कदापि देऊ इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवर राज्यपालांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी चर्चा केली.

 

काश्मीरमधील परिस्थिती आठवडाभरात स्थिर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिस्थितीचा अंदाज घेऊन या परिसरातील निर्बंध हळूहळू उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या प्रतिनिधी मंडळांसोबत काश्मीरमध्ये पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, राहुल गांधींना विशेष विमानाने येण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, राहुल गांधींनी काश्मीरमध्ये इतर विरोधी पक्षांच्या मंडळांसह स्वतंत्र्यरित्या फिरण्यासाठी येणार असल्याचे म्हटले होते.

 
@@AUTHORINFO_V1@@