महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी-कर्मचा-यांना सेवा पदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : देशातील ४० तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी बुधवारी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील तीन अधिका-यांचा यात समावेश आहे. स्वांतत्र्य दिनानिमित्त बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.

 

तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक प्रदान करण्यात येतात. प्रतिष्ठित सेवेसाठी देशातील तीन तुरुंग अधिका-यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार शकील शेख यांना हे मानाचे सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे.

 

याशिवाय, देशातील ३७ तुरुंग अधिकारी-कर्मचा-यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील दोघा कर्मचा-यांना समावेश आहे. बायखळा जिल्हा कारागृहाचे सिपाई जितेंद्र काटे आणि कल्याण जिल्हा कारागृहाचे सिपाई अशोक ठाकूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले.

@@AUTHORINFO_V1@@