नवी बुलेट १ लाख १२ हजारांत : ९ ऑगस्टपासून बुकींग सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |


 
 

'रॉयल एनफिल्‍ड'तर्फे 'बुलेट ३५०' आणि 'बुलेट ३५० ईएस ६' नवे व्‍हेरिएण्‍ट्स सादर

 


मुंबई : रॉयल एनफिल्‍डने आयकॉनिक रॉयल एनफिल्‍ड बुलेटच्‍या सहा नवीन व्‍हेरिएण्‍ट्ची घोषणा केली आहे. बुलेट आता १,१२,०००/- रूपये (एक्‍स-शोरूम) इतक्‍या किंमतीमध्‍ये उपलब्‍ध असणार आहे. भारतात जवळपास ९३० डीलर्स टचपॉइण्‍ट्स, ८८०० अधिक सर्विस बेज आणि नऊशेहून अधिक अधिकृत सर्विस वर्कशॉप्‍ससह रॉयल एनफिल्‍डचे देशातील प्रीमिअम ब्रॅण्‍ड्समध्‍ये सर्वात व्‍यापक विक्री व सेवा नेटवर्क आहे.

 

नेटवर्कमध्‍ये भर करत रॉयल एनफिल्‍डने द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे आणि नगरांमध्‍ये २५० नवीन डीलर टचपॉइण्‍ट्सच्‍या सादरीकरणाची घोषणा केली. आजपासून कार्यरत असणाऱ्याव्या रॉयल एनफिल्‍ड स्‍टुडिओ स्‍टोअर्समध्‍ये शहरांमधील विद्यमान डीलरशिप्‍स म्‍हणून काही रिटेल माहिती मिळेल. या स्‍टोअर्समध्‍ये सर्व्हिस व स्‍पेअर्सव्‍यतिरिक्‍त मोटरसायकल्‍सचा संपूर्ण पोर्टफोलिओ असेल.

 

कंपनीला आर्म्‍ड फोर्ससोबत असलेल्‍या दीर्घकालीन सहयोगाचा अभिमान वाटतो. तसेच कंपनीला निवृत्‍त सेनानीकडून नवीन स्‍टोअर्सचे उद्घाटन करण्‍याचा देखील अभिमान वाटतो. कंपनीने आयकॉनिक रॉयल एनफिल्‍ड बुलेटच्‍या सहा नवीन व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या सादरीकरणाची देखील घोषणा केली. बुलेट आता १,१२,०००/- रूपये (एक्‍स-शोरूम) इतक्‍या किंमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल.

 


नवीन स्‍टुडिओ स्‍टोअर्स आणि नवीन बुलेट मोटरसायकल्‍सच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना रॉयल एनफिल्‍डचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विनोद के. दासरी म्‍हणाले, ''सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांसाठी व्‍यापक उपलब्‍धता निर्माण करण्‍याचा आणि भारतात आमची व्‍यापक उपस्थिती निर्माण करण्‍याचा आमचा सातत्‍यपूर्ण प्रयत्‍न राहिला आहे. आम्‍हाला छोटी नगरे व शहरांमधून लक्षणीय मागणी येत आहे. यामधून विकासासाठी प्रचंड क्षमता दिसून येते. लवकरच ही छोटी शहरे मध्‍यम-वजनाच्‍या मोटरसायकल विभागासाठी एक मोठी बाजारपेठ बनतील.", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

ते म्हणाले, "शहरांतील मोटरसायकलप्रेमींमध्‍ये आरामदायी मोटरसायकल राइडचा ट्रेण्‍ड झपाट्याने वाढत आहे. शहरांमध्‍ये आमची पोहोच लक्षणीयरित्‍या वाढवणे आणि प्रबळ नेटवर्क निर्माण करण्‍याच्‍या हेतूसह आम्‍हाला २५० नवीन रॉयल एनफिल्‍ड स्‍टुडिओ स्‍टोअर्सच्‍या सादरीकरणाची घोषणा करताना आनंद होत आहे. या आर्थिक वर्षाच्‍या अखेरपर्यंत आणखी स्‍टोअर्स सादर करण्‍याची आमची योजना आहे.''



प्रामुख्‍याने भारतभरातील छोटी नगरे व शहरांमध्‍ये स्थित असणारे रॉयल एनफिल्‍ड स्‍टुडिओ स्‍टोअर्स हे अद्वितीय व सुसंगत आहेत. या स्‍टोअर्समध्‍ये रॉयल एनफिल्‍ड मोटरसायकल्‍सची संपूर्ण रेंज असेल. तसेच या स्‍टोअर्समध्‍ये सेवा, स्‍पेअर्स, मोटरसायकल्‍स अॅक्‍सेसरीज आणि अपॅरल्‍सची संपूर्ण रेंज असेल. हे स्‍टोअर्स ५०० ते ६०० चौरस फूटांवर विस्‍तृत असतील आणि विद्यमान रॉयल एनफिल्‍ड डीलरशिपसह कार्यरत असतील. ही सुसंगत स्‍टोअर्स विद्यमान ग्राहकांना विक्री व सेवा लक्षणीयरित्‍या उपलब्‍ध करून देतील आणि देशातील बाजारपेठांमधील संभाव्‍य ग्राहकांच्‍या वाढत्‍या मागण्‍यांची पूर्तता करतील.

 


नवीन बुलेट संभाव्‍य ग्राहकांना नवीन उत्‍साही, आकर्षक रंग आणि समकालीन डिझाइन थीम्‍समधील विविध पर्याय देते. बुलेट ३५० तिच्‍या विद्यमान काळ्या रंगातील व्‍हेरिएण्‍टसह आता बुलेट सिल्‍व्‍हर, सफायर ब्‍ल्‍यू आणि बुलेट ओनिक्‍स ब्‍लॅक या तीन नवीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध असणार आहे. बुलेट ३५० ईएस सध्‍याच्‍या मरून व सिल्‍व्‍हर व्‍हेरिएण्‍ट्सव्‍यतिरिक्‍त जेट ब्‍लॅक, रिगल रेड, रॉयल ब्‍ल्‍यू या रंगांमध्‍ये सादर करण्‍यात येईल. तसेच या मोटरसायकल्‍समध्‍ये आकर्षक ब्‍लॅक्‍ड आऊट थीम असणार आहे. नवीन बुलेट मोटरसायकल्‍स भारतभरातील रॉयल एनफिल्‍ड स्‍टोअर्समध्‍ये एक्‍स-शोरूम किंमत ,१२,००० रूपयांमध्‍ये (एक्‍स-शोरूम) बुक करता येतील.

 


मोटरसायकल्‍सच्‍या नवीन बुलेट रेंजचे सादरीकरण हे ग्राहक समाधानाच्‍या दिशेने आणखी एक लक्षणीय पाऊल आहे. रॉयल एनफिल्‍डने 'कॉस्‍ट ऑफ ओनरशीप' सुधारण्‍यासंदर्भात एक नवीन उपक्रम सुरू करण्‍याची घोषणा केली. कंपनी आपल्‍या सर्व अधिकृत सेवा केंद्रांमध्‍ये सेवेसाठी सेमी-सिथेंटिक तेलाच्‍या नवीन मिश्रणासह प्रक्रिया व तंत्रज्ञांचा नवीन दर्जा वापरण्‍यास सुरूवात करणार आहे. हे उपक्रम सर्विस कालावधी ३ महिने/३००० किमीवरून ६ महिने/५००० किमीपर्यंत वाढवणार आहेत.

 

ऑईल बदलण्‍याचा कालावधीही १२ महिने किंवा १०,००० किमीपर्यंत वाढला आहे. यापूर्वी हा कालावधी ६ महिने किंवा ५००० किमी होता. यामुळे एका वर्षात कराव्‍या लागणा-या सर्विसचे टप्‍पे ३ वर्षांच्‍या कालावधीमध्‍ये सरासरी ४० टक्‍क्‍यांनी कमी होतील आणि मेंटेनन्सच्या खर्चामध्‍ये लक्षणीयरित्‍या सुधारणा होईल. हा नवीन सर्विस सुधारणा उपक्रम सध्‍याच्‍या सर्व 'युनिट कन्‍स्‍ट्रक्‍शन इंजिन'मधील इंजिन मोटरसायकल्‍ससाठी लागू असेल. यामध्‍ये बुलेट, क्‍लासिक आणि थंडरबर्ड या मोटरसायकल्‍सचा समावेश आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@