प्रसिद्ध मिका सिंहवर ऑल इंडियन सिनेवर्कर्स असोसिएशनकडून बॅन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |


 


मिका सिंह हा भारतात एक गायक म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या एवढे तणावाचे वातावरण असूनदेखील गेल्या ८ तारखेला पाकिस्तानमधील एका मोठ्या कार्यक्रमात गायल्यामुळे ऑल इंडियन सिनेवर्कर्स असोसिएशनकडून मिकाला बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिका सिंह हा त्याच्या गाण्यांपेक्षा चुकीच्या वर्तणुकीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला कलाकार आहे. त्यामुळे या निर्णयाविषयी नवल वाटणारे असे फारच कमी लोक असावे. ऑल इंडियन सिनेवर्कर्स असोसिएशनने या विषयी प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये त्याला बॅन करण्याची सविस्तर कारणे नमूद केली आहेत. पत्रामध्ये म्हटल्यानुसार मिका सिंह ८ ऑगस्ट २०१९ ला पाकिस्तानातील कराची येथे झालेल्या एका कार्यक्रमात गायला, जो कार्यक्रम वरकरणी पाकिस्तानचे माजी लष्कर संचालक परवेझ मुशर्रफ यांच्याशी संबंधित होता. अशा कार्यक्रमाला हजेरी लावून मिकाने आपल्या देशापेक्षा मानधनाला महत्व दिले म्हणून भारतातील चित्रपट सृष्टीतील कोणतीही संस्था मिका सिंह बरोबर गाण्याचे अथवा कोणत्याही प्रकारचे कॉट्रॅक्ट करणार नाही असा निर्णय घेण्यात आला. 



 

कलाम ३७० रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे अशावेळी ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे की भारतातील एका प्रसिद्ध व्यक्तीने आपल्या देशाच्या अभिमानापेक्षा आपल्या व्यावसायिक फायद्याचा महत्व दिले. असे देखील या पात्रात नमूद करण्यात आले असून ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी या पात्राच्या माध्यमातून आपल्या संस्थेचा अधिकृत निर्णय जाहीर केला आहे.

उद्या १५ ऑगस्ट, आपल्या देशाचा ७३ वा स्वातंत्र्य दिन. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या देशातील कित्येक क्रांतीकरांनी, जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशावेळी मिका सिंह यांचे हे कृत्य त्यांना शोभा देणारे नाही हे खरेच मात्र त्याही पलीकडे ही एक सांगीतिक घुसखोरी आहे असे म्हटले तर वावगे वाटू नये.

@@AUTHORINFO_V1@@