भारत-चीन सीमावाद सुटणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |

 
नवी दिल्ली: लवकरच भारत चीन सीमाप्रश्नावर चर्चा होणार असून दोन्ही देशाच्या विशेष प्रतिनिधींमार्फत हा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. भारताचे विशेष प्रतिनिधी म्हणून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात ही बैठक होणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या दोन दिवसीय चीन दौऱ्यात सीमा प्रश्नावर बैठकीचा निर्णय घेण्यात आला.
 
 

जम्मू-काश्मीरचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय झाल्यानंतर ही बैठक आवश्यक आहे. कारण लडाखची सीमा चीनला लागून आहे. सीमा प्रश्नावर चीनकडून भारताला काही प्रस्ताव देण्यात आल्याचे वँग यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना सांगितले. चीनकडून आलेले प्रस्ताव म्हणजे सीमावादावर तोडगा काढण्याची त्यांची इच्छा असल्याचे संकेत आहेत. जम्मू काश्मीरचे दोन राज्यात विभाजन झाल्यांनतर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे कारण लडाख ची सीमा चीनला लागूनच आहे.

 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करून त्याचे २ राज्यात विभाजन केल्यानंतर आता भारत चीन सीमाप्रश्नी पहिलीच बैठक आहे. या बैठकीची तारीख निश्चित सांगण्यात आली नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या अनौपचारीक परिषदेआधी ही बैठक होऊ शकते. भारताची हा सीमाप्रश्न सोडवण्याची इच्छा असली तरी चीनकडून मात्र याबाबत कोणताही पुढाकार आत्तापर्यंत घेतला गेला नसल्याचे या प्रक्रियेत सहभागी असणारे अधिकारी सांगतात. तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करणेही चीनला मान्य नसल्याचे कळते.

@@AUTHORINFO_V1@@