'३७०' हटविण्याचा निर्णय राष्ट्रहितार्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून 'कलम ३७०' हटविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले. काश्मीरबाबत सरकारने घेतलेला निर्णय राष्ट्रहितार्थ असून हा कोणत्याही राजकारणाचा भाग नाही, असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले.

 

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, "तुम्ही अशा लोकांची यादी बनवा ज्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याला विरोध केला. या यादीत तुम्हाला स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांप्रती सहानभुती दाखविणारे लोक आणि विरोधी पक्षातील काही नेते दिसतील. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही राजकीय विचारधारेशी जोडलेला असो. प्रत्येक जण केंद्र सरकारने जम्मू काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करत आहे. हा विषय राष्ट्राचा आहे यात राजकारणाचा भाग नाही. देशातील लोकांना हा धाडसी निर्णय वाटतो कारण आजतागायत जे अशक्य वाटत होते ते शक्य होताना दिसत आहे, " असे मोदी यावेळी म्हणाले.

 

जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, "हळूहळू जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल. कलम ३७० मधील काही घटक देशासाठी नुकसानकारक होते. त्यामुळे काही राजकारण्यांना आणि फुटिरतावाद्यांना मदत मिळत होती. हे स्पष्ट होते की, कलम ३७० आणि ३५ ए मुळे जम्मू काश्मीर, लडाखला देशापासून वेगळे ठेवले होते. गेल्या ७ दशकांपासून लोकांना याचा फायदा झाला नाही. लोकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते. सर्वात मोठे नुकसान असे झाले की आजतागायत जम्मू काश्मीर, लडाखचा आर्थिक विकास झाला नाही. मात्र आता काश्मीरच्या आणि लडाखच्या विकासाला चालना मिळेल," असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

@@AUTHORINFO_V1@@