१४ ऑगस्ट भारतासाठी 'काळा दिवस'च

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : नुकतेच केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. जम्मू-काश्मीर यांना केंद्रशासित प्रदेशात रूपांतरित करून काश्मीरला भारतात सामावून घेतले. यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानने भारतासोबत असलेले सर्व व्यापारी संबंध तर तोडलेच पण त्याचबरोबर भारताचा स्वातंत्र्य दिन हा पाकिस्तानात काळा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज भारतात १४ ऑगस्ट हा दिवस 'काळा दिवस' म्ह्णून साजरा केला जात आहे. आता काश्मीरचा उर्वरित पाकव्याप्त भाग भारतात सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या पावलांकडे पाकिस्तानसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 

आपण यंदाच्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी देशाचा ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. १५ ऑगस्ट रोजीच इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामीगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. पण, या स्वातंत्र्यासोबत आपल्या वाट्याला एक दुःखही आले होते. आपला देश दोन देशांत विभाजित झाला होता. भारतापासून विभाजित होऊन पाकिस्तान एक वेगळा देश झाला. भारताच्या काश्मीर खोऱ्यातील काही भागावर पाकने ताबा घेतला, हाच भाग सध्या पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून तो ही लवकरच भारतात समाविष्ट केला जाण्याचे संकेत केंद्र सरकारने आधीच दिले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@