लवासामुळे निसर्गाची हानी : संभाजी भिडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2019
Total Views |


 

 

कोल्हापूर : शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली आणि कोल्हापूर भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी 'लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला' अशा कठोर शब्दात टीका करताना त्यांना अश्रू अनावर झाले. "निसर्गाचा माणसानेच मुडदा पाडला आहे. त्यामुळे त्याचे रौद्ररूप पाहण्यास मिळते. २००५ पेक्षा शंभरपटीने भीषण स्थिती सांगली कोल्हापुरात अनुभवायला मिळाली. फक्त लवासाच नाही गावोगावी असाच निसर्गाचा मुडदा पडतो आहे," असेही संभाजी भिडे यांनी सांगितले. "आता आईच्या मायेने सगळे सावरायला हवे," हे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.

 

"निसर्गाच्या या आपत्तीला आधुनिकीकरण जबाबदार आहे. २००५ ला म्हणत होते की, ६० वर्षांनी असा पूर आला. मात्र आत्ता आलेले संकट हे २००५ च्या पुराच्या तुलनेत शंभरपटीने जास्त आहे. अनेकजण ताठपणे याही परिस्थितीला तोंड देत आहेत. ही बाब खरच कौतुकाची आहे, असेही संभाजी भिडे यांनी सांगितले. शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही पूरग्रस्तांना मदत करत आहेत. प्रशासन पूरपरिस्थिती सावरण्यासाठी योग्य दिशेने पावले टाकत आहे, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले. तसंच पूरस्थितीत जसे सगळेजण एकजूट करून राहिले तसेच आता पुढच्या संकटांचा सामना करण्यासाठीही सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@