सिक्कीममध्ये भाजपचे खाते उघडले, १० आमदारांचा भाजपात प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : सिक्किमचा प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) च्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मंगळवारी राजधानी दिल्लीत भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस राम माधव यांच्या उपस्थितीत या दहा आमदारांचे स्वागत करण्यात आले. सिक्कीममध्ये सध्या एसडीएफचे एकूण १५ आमदार होते. मात्र, १० आमदारांच्या पक्षांतरानंतर पक्षाचे संस्थापक पवनकुमार चामलिंग व अन्य चार आमदार एवढंच संख्याबळ शिल्लक आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत 'भोपळा'ही न फोडता आलेल्या भाजपकडे १० आमदारांची संख्या झाली आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@