तेजस्वी सूर्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्नाटकमध्ये दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2019
Total Views |


 

काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राबरोबरच देशातील अन्य भागातदेखील पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर बचावकार्य तसेच मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर उत्तर कर्नाटकातदेखील पूरपरिस्थिती ओढवली आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतील दक्षिण बंगळुरूचे प्रतिनिधी असलेले तेजस्वी सूर्या कर्नाटकमधील पूरग्रस्तांची मदत करण्यास हजर झाले आहेत.


याप्रसंगी पूरग्रस्तांसाठी कर्नाटकातील एका व्यावसायिकाने १० हजार रुपयांची मदत तेजस्वी सूर्या यांच्याकडे सुपूर्द केली आहे. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचादेखील प्रयत्न केला. त्याचबरोबरीने साथीच्या रोगांपासून प्रतिबंध करण्यासाठी ७ लाखांची औषध सामग्रीदेखील येथे उपलब्ध करून दिली. तसेच १२ हजार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले आहे. कर्नाटकमधील पूरपरिस्थिती सध्या गंभीर आहे. मल्लाली गावामध्ये ७ हजार घरे पाण्याखाली गेली आहेत.

 

@@AUTHORINFO_V1@@