सारस्वत बॅंकेतर्फे पूरग्रस्तांना एक कोटींची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2019
Total Views |



मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांसाठी विविध व्यक्ती आणि संस्थांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत म्हणून सारस्वत बॅंकेतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला एक कोटींची मदत करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, नाशिक, कोकण व अन्य जिल्ह्यात पूरस्थिती ओढवली होती.

 

दरम्यान, आता पूर ओसरत असला तरी पूरग्रस्तांचे पुनर्वसनाचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. या कार्याला हातभार म्हणून सारस्वत बॅंकेतर्फे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही मदत देण्यात आल्याची माहिती बॅंकेतर्फे देण्यात आली.

 

सारस्वत बॅंकेविषयी...

गेली शंभर वर्षे शेड्युल्ड बँकिंग क्षेत्रात सेवा देणारी सारस्वत बॅंक ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर अव्याहतपणे विस्तार करत आहे. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि कर्नाटक आदी राज्यांमध्ये ५८ हजार कोटींच्या उलाढालीसह व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहे. या राज्यांमध्ये एकूण २८० शाखा आणि २६० एटीएम सेवा केंद्र उपलब्ध आहेत.

 
@@AUTHORINFO_V1@@