आता लक्ष पाकव्याप्त काश्मीरवर, केंद्र सरकारचे संकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2019
Total Views |

 

इंदोर : कलम ३७० तर हटवले, आता केंद्र सरकारचे लक्ष पाकव्याप्त काश्मीरवर असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर केंद्र सरकारचं आता पुढचं पाऊल पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेणे आहे. कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान घाबरले आहे, म्हणूनच त्यांच्याकडून व्यापारी, राजकीय संबंध तोडण्यात आले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. जम्मू-काश्मीर राज्याचा तो भाग असल्याने तो देशाला जोडणे आमचे काम आहे, असेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.
 
 

इंदोर येथील भाजप कार्यालयात जावडेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीर राज्याचा भाग असल्याने सध्या त्या ठिकाणच्या विधानसभेच्या जागा रिक्त ठेवण्यात येतील. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकारची नजर पाकव्याप्त काश्मीरवर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 
 
  

 

मागील सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक आणि कलम 370 हटवण्याच्या शिफारशीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले होते की, "जेव्हा मी जम्मू-काश्मीर राज्य असा उल्लेख करतो, त्यात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनही येते. काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा संसदेला अधिकार आहे. त्यासाठी कुणाचीही संमती घ्यायची गरज नाही. संसद हे सर्वोच्च सभागृह आहे," असेही अमित शाह म्हणाले होते. तसेच पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@