'डीएसके'चे दुसरे बंधू पोलिसांच्या ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2019
Total Views |


 


पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात, 'डीएसके' यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. सुमारे अडीच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची किमान २३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कुलकर्णी बंधूंवर आहे. 'डीएसके' कंपनीत मकरंद कुलकर्णी हे प्रवर्तक आहेत. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मकरंद कुलकर्णी अमेरिकेला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मकरंद कुलकर्णी फरार होते. पोलीस मकरंद यांचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. पण ते सापडत नसल्यामुळे त्यांच्या विरोधात 'लुकआऊट नोटीस' काढण्यात आली होती.

@@AUTHORINFO_V1@@