राणेंना मदतीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही ! केसरकरांचे राणेंना प्रतिउत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2019
Total Views |




मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नऊ कोटींचा निधी आणला. माझ्या काळात साडेचार वर्षात जिल्ह्यासाठी ५६ कोटींचा निधी आणला. मग तुम्हीच ठरवा कोण उत्तम काम करतो ते, असे मंगळवारी गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. राणेंना मदतीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशी टीका करत केसरकर यांनी राणे यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला सडेतोड उत्तर दिले. ते मंत्रिपरिषदेच्या बैठकीत केल्या मागणीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरपरिस्थिती व्यवस्थित हाताळली गेली नाही. ती हाताळण्यात पालकमंत्री व स्थानिक प्रशासन कमी पडले. 'मस्वाप' याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा 'मस्वाप'चे अध्यक्ष व खा. नारायण राणे यांनी नुकताच दिला होता. त्यावर मंगळवारी गृहराज्यमंत्री व राणे यांचे कट्टर विरोधक यांनी प्रतिउत्तर दिले.

 

पूरपरिस्थितीतून सिंधुदुर्ग जिल्हा सगळ्यात लवकर बाहेर पडला, असा दावा यावेळी केसरकर यांनी केला. आम्ही बोलणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. आमची मदत अगदी वेळेत पोहोचली. राणेंचे लोक आता बाहेर पडले व मदत करू लागले, असेही ते म्हणाले. आम्ही दाखवण्यासाठी काम करत नाही. आमची बांधिलकी लोकांच्या कामांशी आहे. बोलणाऱ्यांकडे व प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळही नाही, असे केसरकर यांनी राणे यांना उद्देशून खोचकपणे सांगितले.

 
@@AUTHORINFO_V1@@