टँकरमुक्त मराठावाडा ते जलयुक्त मराठावाडा

    13-Aug-2019
Total Views |



दीपक मोरताळे, रा. स्व. संघ ग्रामविकास विभाग प्रमुख, नांदेड विभाग, बाबुरावजी केंद्रे, उदय संगारेड्डीकर यांनी ‘टँकरमुक्त मराठवाडा ते जलयुक्त मराठवाडा’ ही संकल्पना राबवण्यासाठी नियोजन केले. रा. स्व. संघाच्या विचारांनी आणि सहकार्याने ती संकल्पना यशस्वीही झाली. या नियोजित जलसंवर्धन कामाचे यश म्हणजे या कामातून १५० कोटी लिटर जलसंवर्धन होणार आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने या सर्व कामांना आर्थिक सहकार्य केले. त्यातूनच टँकरमुक्त ते जलयुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकारले जाणार आहे.

 

टँकरमुक्त मराठावाडा ते जलयुक्त मराठावाडा उपक्रमांतर्गत सुरु असलेले प्रकल्प:-

. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ : जल व पर्यावरण संवर्धनाचे प्रशिक्षण केंद्र भविष्यात जलसाक्षरता व पर्यावरण संवर्धनाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत देण्याची आवश्यकता भासणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, सूर्योदयाफाऊंडेशन, मुंबई व नांदेड सोशल ग्रुप यांच्या मदतीने जल व पर्यावरण संधारण प्रशिक्षणासाठीचा प्रकल्प विद्यापीठ परिसरात उभारण्यात आला आहेया प्रकल्पाची साठवण क्षमता एका पावसात दोन कोटी लिटर व एका पावसाळी हंगामात १० कोटी लिटर आहे. तसेच २५ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांचा उदा. Deep CCT, Bo, नदीखोलीकरण व रुंदीकरण यांचा अभ्यास करता येईल. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांमधील ३५० महाविद्यालयांमध्ये तीन लाख विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्यास मदत होणार आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल, प्रकल्प समन्वयक दीपक मोरताळे व श्रीकांत चौहान यांच्या संकल्पनेतून हा पथदर्शी प्रकल्प उभा राहिला आहे. या प्रकल्पामुळे पाणी व पर्यावरणासाठी लोक चळवळ उभी राहत आहे.




 

. दुष्काळात १३ गावांना पाणीपुरवठा

१७ फेब्रुवारी, २०१९ रोजी रा. स्व. संघाच्या ‘दुष्काळ विमोचन समिती, नांदेड’तर्फे दुष्काळग्रस्त गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई दिसून आली. तात्काळ उपाययोजना करण्यासाठी समितीच्या सभासदांनी वर्गणी गोळा करून पाणी टॅँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. २४ फेब्रुवारी, २०१९ या दिवशी पहिला पाणी टँकर पाठवण्यात आला. या उपक्रमाची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली. दात्यांनी उत्स्फूर्तपणे उपक्रमात सहभाग घेतला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुधाकर काळे, नांदेड यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नातील अनावश्यक खर्च कमी करून भिल्लू नाईक तांडा ता. लोहा या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आर्थिक मदत केली. या गावाला नांदेडमधील व्यापारी, परिवार सुपर मार्केट, पूज्य सिंधीपंचायत, रिदम डीव्हाईन ग्रुप, टूगेदर वि कॅन डू इट ग्रुप, पुणे, नानाजी देशमुख फाऊंडेशन, मुंबई, जैन सुशील बहू महिला मंडळ, नांदेड यांनी आर्थिक मदत केली. त्यामुळे १३ गावांना दोन ते तीन महिने पाणी पुरविण्यात आले. तसेच वन्यप्राणी, पक्षी व पाळीव प्राणी यांची पिण्याच्या पाण्याची हेळसांड थांबविण्यासाठी जलकुंभ माळरानावर ठेवून तेथे टँकरने रोज पाणी भरण्यात आले. त्यामुळे वन्यजीवांचाही जीव वाचला.

 

३. भिल्लू नाईक तांडा : दुष्काळाकडून जलश्रीमंतीकडे

या तांड्यावर मागील २५ ते ३० वर्षांपासून फेब्रुवारी ते जून या काळात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. भिल्लू नाईक तांडा येथे १६ शेततळी व तलाव असून १०० DEEP CCT, जलकुंभ निर्माण करण्यात आले. या कामामुळे १५ कोटी लिटर्सपेक्षा जास्त पाणी साठवण्यास व ५० कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवण्यास मदत होणार आहे. प्रत्येकी पाच लाख लिटर पाणी मिळेल. कदाचित हे महाराष्ट्रातील जलश्रीमंत गाव ठरेल. या कामासाठी ‘सूर्योदया फाऊंडेशन’ तसेच ‘रिदम डीव्हाईन ग्रुप’ यांच्या आर्थिक साहाय्याने जलसंवर्धनाचे काम पूर्ण करण्यात आले. नागदरवाडीचे हनुमंत उर्फ बाबुराव केंद्रे व दीपक मोरताळे यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण केले. गावकर्‍यांनी ब्लास्टिंगसाठीचा खर्च शेळ्या, गुरे विकून उभा केला. गावकरी अत्यंत गरीब परिस्थितीतील आहेत. परंतु, त्यांनी जिद्दीने हे काम पूर्ण केले. हे काम भय्यूजी महाराज यांना अर्पण करण्यात आले आहे. या कामाला ‘भय्यूजी महाराज जलनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. या कामाला आर्थिक साहाय्य्य सूर्योदया फाऊंडेशन, मुंबई तसेच ‘रिदम डीव्हाईन ग्रुप’ यांनी केले.




 

. जलस्वराज्य हे आजच्या पिढीचे स्वप्न - कलंबर खुर्द, ता. लोहा, जि. नांदेड : २ शिवनेरी बंधारे

अवघ्या ५० दिवसांमध्ये दोन शिवनेरी बंधारे पूर्ण केले. कलंबर खुर्द येथे नदीचे वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी ३ मे रोजी या बंधार्‍याचे भूमिपूजन करण्यात आले. अवघ्या ५० दिवसांमध्ये दोन शिवनेरी बंधारे बांधून पूर्ण झाले आहे. रा. स्व. संघ आयोजित ‘जलसंवाद २०१९’ कार्यशाळेत ग्रामविकास विभाग संयोजक दीपक मोरताळे, मारुती घोरबांड यांनी प्रेरणा घेऊन फेरोसिमेंट पद्धतीच्या शिवनेरी बंधार्यांची निर्मिती करण्याचा पहिला प्रयोग यशस्वी केला. प्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल व श्रीकांत चौहान यांच्या सूर्योदया फाऊंडेशन व सारस्वत बँक या संस्थांच्या सहकार्याने याकामासाठी १० लाखांचा निधी उपलब्ध झाला. गावकर्‍यांनी आठ लाख रुपयांचा निधी गोळा केला. १८ लाख रुपयांमध्ये हे दोन बंधारे पूर्ण झाले. ५० लाख लिटर पाणी यात साठणार आहे. दीपक कान्हेरे यांच्या ‘सायुज्य ऊर्जा प्रा. लि.’ या कंपनीने ही किमया ५० दिवसांमध्ये पूर्ण केली आहे. जलस्वराज्याच्या दिशेने हा प्रकल्प नांदेड जिल्ह्याला दिशादर्शक ठरेलया प्रकल्पाला आर्थिक साहाय्य्य सूर्योदया फाऊंडेशन, मुंबई, सारस्वत बँक तसेच कलंबर खुर्द ग्रामस्थांनी केले आहे.

 

. वडेपुरी ता. लोहा, जि. नांदेड : ३ किमी नदीखोलीकरण व रुंदीकरण

सूर्योदया फाऊंडेशन’मार्फत २० एप्रिल, २०१९ रोजी नांदेड जवळील रत्नेश्वरी वडेपुरी या गावात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच तलावातील गाळ काढण्यासाठी एक पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले. त्याचे उद्घाटन कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, उपेंद्रभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. गावकर्‍यांनी डिझेलसाठी लोकसहभागातून निधी गोळा केला. तीन किमी नदी खोलीकरण, रुंदीकरण व तलावातील गाळ काढण्यात आला. खोलीकरण करीत असताना केवळ नऊ फुटांवर मोठा झरा लागला. यामुळे भर उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. यासाठी आर्थिक साहाय्य सूर्योदयाफाऊंडेशन, मुंबई तसेच वडेपुरी ग्रामस्थ यांनी केले. त्याचप्रमाणे दापशेड, ता. लोहा, जि. नांदेड येथे दोन कोटी लिटरचे दोन तलाव लोकोपयोगी केले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दोन कोटी लिटरचे दोन तलाव खोदण्यात आले. या तलावाचा थेट फायदा गावातील कूपनलिकांना व विहिरींना होणार आहे.

 

. नंदूतांडा ता. लोहा, जि. नांदेड : गावतलाव खोलीकरण व दुरुस्ती

नांदेड येथील व्यापारी सुधाकर बंडेवार यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नपत्रिका न छापता या तलाव दुरुस्तीसाठी आर्थिक साहाय्य केले. सूर्योदया फाऊंडेशनमार्फत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आले. नांदेड जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ यांनीही या कामासाठी आर्थिक मदत केली. यामुळे गावतलावाची दुरुस्ती होऊन दोन कोटी लिटर अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी आर्थिक साहाय्य सूर्योदया फाऊंडेशन, मुंबई, सुधाकर बंडेवार, तसेच नांदेड जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ यांनी केले.



 

.रुपला तांडा, ता. लोहा, जि. नांदेडची जलसमृद्धीकडे वाटचाल

येथे पाच शेततळी असून १०० DEEP CCT चे काम अवघ्या सात दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले. या कामामुळे पाच कोटी लिटर पाणी क्षमता वाढणार आहे. सूर्योदया फाऊंडेशनमार्फत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी आर्थिक साहाय्य्य सूर्योदया फाऊंडेशन, मुंबई, तसेच नारायण रेकी सत्संग परिवार, नांदेड यांनी केले

 

. हरीशचंद्र तांडा ता. लोहा, जि. नांदेड : नदीखोलीकरण व १०० ऊएएझ उउढ

नदीखोलीकरण ६०० मीटर व १०० DEEP CCT चे पूर्ण करण्यात आले. यामुळे दोन कोटी लिटर पाणीसाठा वाढणार आहे. सूर्योदयाफाऊंडेशनमार्फत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आले.

आर्थिक साहाय्य्य सूर्योदया फाऊंडेशन, मुंबई, तसेच नांदेड जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ, नांदेड यांनी केले.

 

. दत्तमांजरी, ता. माहूर, जि. नांदेड : तलाव दुरुस्ती

दत्तशिखर माहूर, दत्त मांजरी येथील काळा पाणी तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. यामुळे पाच कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी साठविण्यास मदत होणार आहे. सूर्योदया फाऊंडेशनमार्फत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आले. दत्तशिखर संस्थान, अरुण डोंगरे जिल्हाधिकारी नांदेड यांनी डिझेलची व्यवस्था केली. देवस्थान संस्थान, शासन व समाज सेवा संस्था याचा सुरेख संगम या कामात दिसून आला. यासाठी सूर्योदया फाऊंडेशन, मुंबई, दत्तशिखर संस्थान, माहूर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.

 

१०. मातृतीर्थ, ता. माहूर, जि. नांदेड

शेकडो वर्षानंतर मातृतीर्थ तलावातील गाळ काढण्यात आला. या कामामुळे १० कोटी लिटर पाणी साठणार आहे. माहूर येथील अनेक कुंड आज लुप्त झाली आहेत. निलेश केदार गुरुजी यांनी कालिकापुराणातील माहिती वरून ती कुंड शोधून तेथील गाळ महाश्रमदानातून काढण्यास सुरुवात केली. १० फुटांवर या कुंडामध्ये अनेक स्वच्छ पाण्याचे झरे आढळून आले. या कामाचे महत्त्व ओळखून पद्मश्री डॉ अनुराधा पौडवाल यांनी सूर्योदया फाऊंडेशनमार्फत या कामास मोठ्या प्रमाणात पोकलेन मशीन्स व अन्य मशीन्स उपलब्ध करून दिली. रेणुका माता संस्थान, अरुण डोंगरे जिल्हाधिकारी नांदेड यांनी डिझेलसाठी आर्थिक साहाय्य केले. रेणुका देवी संस्थान, शासन व समाज सेवी संस्था यांचा सुरेख संगम या कामात दिसून आला. या कामासाठी सूर्योदया फाऊंडेशन, मुंबई, दत्तशिखर संस्थान, माहूर, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी सहकार्य केले.

 
दीपक मोरताळे
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.