कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना साई संस्थानकडून १० कोटींची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |


 


शिर्डी : साई संस्थानकडून राज्यातील पूरग्रस्तांना १० कोटींची मदत करण्यात येणार आहे. मात्र, हा मदतनिधी न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून मुख्‍यमंत्री साहाय्यता निधीस देण्‍यात येणार आहे. त्याचसोबत संस्थानकडून २० डॉक्टर्सची टीम पूरग्रस्त भागात मदतीसाठी जाणार आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्यात येणार असल्याची माहिती सुरेश हावरे यांनी दिली.

 
 
 

राज्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. या जलप्रलयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील परिस्थिती अतिशय बिकट असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती भीषण असून राष्ट्रीय कर्तव्य समजून पूरग्रस्तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय मदत आणि औषधेही पूरग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहेत.




@@AUTHORINFO_V1@@