रिलायन्स जिओ फायबरची घोषणा, ७०० रुपयांपासून प्रकाशाच्या वेगाचा ब्रॉडबँड स्पीड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |


 

 

मुंबई: रिलायन्स उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या बहुप्रतिक्षीत जिओ फायबर योजनेची घोषणा आज केली. जिओच्या लाँचिंगच्या तिसऱ्या वर्धापनदिनी म्हणजेच येत्या ५ सप्टेंबरपासून जिओ फायबर लाँच होणार आहे. प्लान्स अगदी ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची आज मुंबईत ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यात ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स फायबरमध्ये १ जीबीपीएसपर्यंतचा अफाट इंटरनेटचा स्पीड ग्राहकांना मिळणार आहे.

 

जिओ फायबरबद्दल अंबानी म्हणाले, "१६०० शहरांमधून १५ दशलक्ष लोकांनी गिगाफायबरची नोंदणी केली होती. जिओ फायबर प्रायोगिक तत्वावर सुरू केले होते. जिओ फायबरमुळे तुम्हाला प्रकाशाच्या वेगाचा ब्रॉडबँड स्पीड मिळेल. याव्यतिरिक्त अन्य अनेक स्मार्ट होम सुविधा आहेत."

 

तंत्रज्ञानाच्या जगाचा आनंद जिओ फायबरमुळे ग्राहकांना लुटता येणार आहे. याचे एक उदाहरण म्हणजे मिक्स्ड रिऍलिटी. 'ऑगमेंटेड रिऍलिटी आणि व्हर्च्युअल रिऍलिटी तंत्रज्ञानाच्या जगात आमूलाग्र बदल घडवले. या दोघांचे मिश्रण असलेली मिक्स्ड रिऍलिटी (AR+VR) जिओ गिगाफायबरवर उपलब्ध होणार आहे," अशी घोषणा इशा अंबानी यांनी यावेळी केली. या मिक्स्ड रिऍलिटीची झलकच त्यांनी एका व्हिडिओ क्लिपद्वारे दाखविली. 
 
 

जिओ ब्रॉडब्रँड सेवेचा स्पीडच १०० एमबीपीएसपासून सुरू होणार असून तो १ जीबीपीएसपर्यंत असणार आहे. जिओ गिगाफायबरवर इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजेच केबल टीव्ही, व्हॉइस कॉलिंग आणि नवे सिनेमे असतील. जिओ गिगाफायबरच्या प्राईम मेम्बरशिप असणाऱ्या ग्राहकांना चित्रपटांचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' अगदी घरबसल्या पाहायला मिळणार आहे. जिओची ही सिनेमाची फर्स्ट डे फर्स्ट शो योजना २०२० च्या मध्यापासून सुरू होणार आहे. ५० लाख घरांमध्ये याआधीच प्रायोगिक तत्वावर जिओ गिगाफायबर सुरू आहे. आता १ अब्ज घरांना जिओ इंटरनेट ऑफ थिंग्जने कनेक्ट करण्याचे रिलायन्सचे लक्ष्य असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

 
 

मुकेश अंबानी म्हणाले, "नव्या भारताचा उदय होतोय. भारताची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. गेल्या वर्षभरात रिलायन्सने मोठी भरारी घेतली. जिओने बाजारपेठेचा ३२ टक्के हिस्सा व्यापला आहे. रिलायन्स हा सर्वाधिक आयकर भरणारा उद्योगसमूह आहे. त्याचबरोबर जिओ जगातली दुसरी मोठी टेलिकॉम ऑपरेटर सेवा बनली आहे."

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@