आज रात्री ९ वाजता, 'मॅन VS वाईल्ड' बघणार ना?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |


 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू भारतवासीयांनी पाहिले आहेत. मात्र, आज त्यांच्या साहसी व्यक्तिमत्वाचे दर्शन सर्वांना घडणार आहे, डिस्कव्हरी चॅनलवरील 'मॅन VS वाइल्ड' या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले असून आज रात्री ९ वाजता हा कार्यक्रम १८० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेची कल्पना आपण करू शकतो.

 

या कार्यक्रमाचे सूत्रधार बेअर ग्रिल्स गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम यशस्वीरित्या चालवत आहेत. यापूर्वी या कार्यक्रमात अमेरिकेचे माजी पंतप्रधान बराक ओबामा तसेच झॅक ऍफ्रोन, बेन स्टीलर यांसारख्या प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या पंतप्रधानांचा या कार्यक्रमातील सहभाग ही भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आलेले अनुभव स्वतः बेअर ग्रिल्स यांनी एका वृत्तवाहिनीशी केलेल्या संवादामध्ये सांगितले आहेत. त्यामुळे अखेर आज हा कार्यक्रम प्रदर्शित होणार असल्याने दर्शकांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकतेचे वातावरण आहे.

@@AUTHORINFO_V1@@