सांगली, कोल्हापूर ओसरतोय... पण सर्वत्र घाणीचे साम्राज्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |


 

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीतील महापूर आता हळूहळू ओसरत असल्याचे चिन्ह दिसत आहे. गेल्या सात दिवस बंद असलेला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळपासून एकेरी वाहतूक सुरु झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे पंचगंगेच्या पुलाच्या अलीकडे महामार्ग पाण्याखाली गेल्याने मागील सात दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यानंतर सोमवारपासून महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, तुर्तास अत्यावश्यक सेवांसाठीच ही वाहतूक सुरू आहे.

 

पुराचे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे कोल्हापूर शहरात पाणीटंचाईसोबत पेट्रोल टंचाई निर्माण झाली होती. मात्र काल कोल्हापूर शहरात पेट्रोलचे टँकर आल्यामुळे पेट्रोल पंप सुरु करण्यात आले. पेट्रोल घेण्यासाठी अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी भल्यामोठ्या रांगा लावल्या. एका बाजूला दुचाकी तर दुसऱ्या बाजूला हातात बाटल्या घेऊन नागरिकांनी गर्दी केली आहे. तसेच पेट्रोल कमी-जास्त मिळत असल्याने नागरिकांमध्ये वादही होत आहेत.

 

पुराच्या पाण्यामुळे ज्या ठिकाणी पाणी ओसरत आहे, तिथे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. पाण्यासोबत आलेला कचरा आणि गाळ यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पुरासोबत आलेल्या गाळामुळे चिखलाचे स्वरूप अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिवाय आता रोगराई पसरण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्त नागरिकांना अनेक सस्यांचा समावेश करावा लागणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@