जम्मू काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : १२ ऑगस्ट म्हणजे बकरी ईद दिवशी देशात मोठ्या घातपाताची शक्यता असल्याचे गुप्तचर यंत्रणेने (आयबी) माहिती दिली. कलम ३७० रद्द केल्यानंतर आता काश्मीरमधून जमाव बंदी शिथिल करण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदचे सात आत्मघातकी दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसले असून बकरी ईद आणि स्वातंत्र्य दिनाला मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आयबीच्या सूत्रांनी दिली.

 

जम्मू-काश्मीरसह देशातील इतर भागातही दहशतवादी हल्ले होऊ शकतात असे आयबीने राज्य पोलिसांना सुचीत केले आहे. इस्लामिक स्टेट किंवा आयएसआयचा पाठिंबा असलेले दहशतवादी गर्दीच्या ठिकाणावर हल्ला करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. आता पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘समुद्री जिहाद’चा कट आखत असल्याचे वृत्त आहे. यानंतर नौदलासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला असून भारतीय नौदल कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी सज्ज आहे.

 

नौदल हाय अलर्टवर आहे. सागरी किनारपट्टीची सुरक्षा वाढवण्यात आली असून कोणत्याही प्रकारचा हल्ला नाकाम करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही त्यांच्यातील प्रत्येकाला रोखण्यात आणि त्यांचा हल्ला नाकाम करण्यासाठी पूर्णतः तयार आहोत. कोणालाही जशास तसे प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे.”, असे भारतीय नौदलाचे उपप्रमुख मुरलीधर पवार म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@