'भाजप लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे': महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |

 

 
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये तर स्थिती गंभीर झाली आहे. तेथील जनतेच्या बचावासाठी सरकारने प्रभावी काम केले आहे. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाचे अवघड आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी भाजपने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निधी संकलनाचे आवाहन केले आहे. सोमवारी पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना केली. सर्व लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टी, आपदा कोषनावाने आपले चेक किंवा ड्राफ्ट द्यावेत, अशी सूचना केली आहे. 
 
 

तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी किमान शंभर रुपये तर कमाल हवे तितके योगदान पक्षाकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावे, असेही ते म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी भाजपतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होणाऱ्या कार्यासाठी भाजप महाराष्ट्र पूरग्रस्त साहाय्यता संयोजक म्हणून माजी प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. लवकरच समितीची स्थापना करण्यात येईल.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@