पाकिस्तान सैरभैर, १५ ऑगस्ट पाकिस्तानात काळा दिवस जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019
Total Views |

 

 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांमध्ये अधिकच वाढ झाली झाले. त्यातच भर म्हणून १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन पाकिस्तानात काळा दिवस जाहीर करण्यात आल्याचे कळते. याबाबतचे परिपत्रकच पाकिस्तान सरकारने जारी केले असून प्रसारमाध्यमांना तशा सूचना करण्यात आल्या आहेत. सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ चॅनल्स या सगळ्यांना ही सूचना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी कोणताही विशेष कार्यक्रम करायचा नाही. काश्मीरसंदर्भात आत्मीयता असलेल्या बातम्या आणि व्हिडिओच प्रसारित करावेत, असेही या पत्रकात पाकिस्तान सरकारने म्हटले आहे.
 
 

१४ ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. हा दिवस आपल्या काश्मीरच्या एकतेचं प्रतीक म्हणून साजरा केला जावा, असेही पाक सरकारने म्हटले आहे. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणूनच दाखवला गेला पाहिजे. या दिवशी झेंडाही अर्ध्यावर आणावा. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या भूमिका काय आहेत, हे दाखवणारे व्हिडिओज दाखवले जावेत. इतकेच नाही तर पाकव्याप्त काश्मीरबाबत पाकिस्तानची भूमिका काय तेही स्पष्ट करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

 
 

भारताने काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान चांगलाच सैरभैर झाला आहे. थर एक्सप्रेस आणि समझोता एक्सप्रेस या रेल्वे गाड्या पाकिस्तानने यापूर्वीच रद्द केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लाहोर-दिल्ली मैत्री बससेवा ही रद्द केल्याचे जाहीर केले व त्यातच भर म्हणून आता काळा दिवस जाहीर करणे. पाकिस्तानकडून सातत्याने आक्रमकतेची भाषा सुरू आहे. पाकिस्तानने युद्धाचेदेखील इशारे दिले आहेत. पाकिस्तानकडून आता लडाखजवळच्या स्कारदु येथील तळावर फायटर विमाने तैनात करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पाकिस्तानने लडाखजवळ असणाऱ्या तळाजवळ आवश्यक युद्ध साहित्य आणण्यास सुरुवात केली आहे.

 
 
 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@