पाकिस्तानी नेटीझन्सचा तीळपापड : सुरू केला अनसबस्क्राइब ट्रेंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासह स्थानिक नागरिकांचाही तीळपापड होत आहेत. भारताशी व्यापार बंद केल्यानंतर समझोता एक्सप्रेस आणि दिल्ली लाहोर बस सेवाही बंद करण्यात आली आहे. यानंतर आता सोशल मीडियावर अनसस्क्राइब बिइंग इंडियन्स ('#UnsubscribeIndiansYoutubers ') हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.




 

पाकिस्तानातून आता भारतीय युट्यूबर्स आणि कलाकारांना अनफॉलो करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, भारतीय नेटीझन्सनीही याला सडेतोड उत्तर मीम्सच्या माध्यमातून दिले आहे. तुम्ही अनफॉलो केल्याने आम्हाला फरक पडत नाही, असा टोलाही नेटीझन्सनी पाकिस्तानला हाणला आहे. यासह सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, विराट कोहली यांसारख्या सेलिब्रेटींनाही अनफॉलो करण्याचे आवाहन पाकिस्तानातून केले जात आहे.

 


भारतीयांनी दिले चोख प्रत्युत्तर

भारतीय नेटीझन्सनी या प्रकारला बालीश बुद्धी असे संबोधले आहे. आम्हाला अनफॉलो केल्यानंतरही सजेशन बॉक्समध्ये आमचेच व्हिडीओ दिसतली, असा टोलाही पाकिस्तानला हाणला आहे. भारतीयांना अनफॉलो केलात तरीही ट्रेंड आमचाच आहे, असा समाचारही पाकिस्तानी नेटीझन्सचा घेण्यात आला आहे.



 
 
@@AUTHORINFO_V1@@