उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2019
Total Views |


'संकटकाळात निवडणूकांचा विचार डोक्यात येतोच कसा'


मुंबई  'महाराष्ट्र संकटात असताना पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असून राजकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे,' असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सध्याच्या परिस्थितीत खंबीरपणे पूरपरिस्थितीचा समाना करणे गरजेचे असून शिवसैनिकांकडून पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

'महाराष्ट्र संकटात असताना राजकारण न आणता पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. पूर ओसरल्यानंतर राजकारण करा, असा सल्ला देत संकटकाळी निवडणुकांचा विचार डोक्यात येतोच कसा,' असा टोला राज यांना लगावला. राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. याला प्रत्युत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगली आणि कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरपरिस्थिती अजूनही कायम आहे, अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 'चूक दाखवा, पण परिस्थितीचे राजकारण नको !', असे आवाहनही त्यांनी सर्वविरोधी पक्षांनाही केले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@