सांगलीत दीड लाख नागरिकांचे पूर्नवसन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2019
Total Views |


३६ हजार जनावरांना चारा छावणी उपलब्ध

 

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण १०४ पूरबाधित गावातील सुमारे २९ हजार ७०६ कुटुंबांतील १ लाख, ५८ हजार ९७०लोक व ३६ हजार ५४ जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

 

डॉ. चौधरी म्हणाले, 'मिरज तालुक्यातील २० गावातील ४ हजार ९६८ कुटुंबांतील २५हजार ३७५ लोक व ६ हजार ३३४ जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील २५ गावातील ७ हजार ४६१ कुटुंबांतील ३६ हजार ६३६ लोक व ११ हजार २५१ जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील ३७ गावांतील १२ हजार २५६ कुटुंबांतील ६५ हजार ५४७ लोक व १५ हजार १३५ जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील २१ गावातील ६०५ कुटुंबांतील २ हजार ९४१ लोक व २ हजार ७२६ जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

 

महानगरपालिका क्षेत्रातील ४ हजार ४१६ कुटुंबांतील २८ हजार ४७१ लोक व ६०८जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. मिरज तालुक्यातील १२, वाळवा तालुक्यातील ३, शिराळा तालुक्यातील २१ तसेच पलूस तालुक्यातील २५ आणि महानगरपालिका क्षेत्रातील ७ प्रभाग यांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे. त्यापैकी वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात स्थलांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज व हरिपूर येथे स्थलांतरणाचे काम सुरू आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@