बकरी ईदनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा व समर्पण भावनेचा संदेश देतो.

 

हा सण साजरा करताना दानधर्म तसेच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे. बकरी ईदच्या सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना विशेषतः मुस्लीम बंधू - भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@